Annual prize distribution ceremony 2025
GALLERY
दिनांक 05 एप्रिल 2025
श्री. डी डी विसपुते डी एड कॉलेज व ऋषिकेश चित्रकला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न……..
दिनांक 05 एप्रिल 2025 रोजी श्री.डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालय, ऑडिटोरियम हॉल येथे आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते सर ,संचालिका मा.सौ.संगिता विसपुते मॅडम यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने तसेच श्री.डी.डी. विसपुते डी. एड. कॉलेज व ऋषिकेश चित्रकला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमांमध्ये प्रथम डी. एड. कॉलेज च्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांनी प्रास्ताविका मध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी motivate केले पाहिजे , त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे तसेच सकारात्मक ऊर्जा दिली पाहिजे.आणि आज तुम्हाला जे सर्टिफिकेट्स व ट्रॉफी मिळणार आहे ते प्रेरणा देण्यासाठी, जेणेकरून तुम्ही पुढील स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेतला पाहिजे. अशा पद्धतीने कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केल्यानंतर बक्षीस वितरणास सुरुवात करण्यात आली.
प्राचार्य मा.श्रीमती कुसुम मधाळे मॅडम व मा. श्री प्रवीण जाधव सर यांच्या हस्ते कला प्रदर्शन, समूहगीत ,वक्तृत्व स्पर्धा, पाककला स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ………तसेच स्पोर्ट्स मधील वेगवेगळ्या खेळामधील स्पर्धेतील विजेते व सहभागी छात्राध्यापकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.
तसेच,
In Cultural Event Solo Performance – Best dance यामध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थिनी मयुरी साळवे प्रथम क्रमांक, Best act with dance – खेळ मांडला. द्वितीय क्रमांक तर जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेली विद्यार्थीनी प्रणिता बनसोडे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तसेच या आनंद सोहळ्याला रंगत आणण्यासाठी सुरेल अशा संगीत अविष्काराचा आस्वाद डी. एड. कॉलेज चे छात्रअध्यापक व चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थिनी नी सुरेख अशा आवाजात गाणे म्हणून देण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका मयुरी साळवे हिने केले तर,
चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री प्रवीण जाधव सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी डी.एड.कॉलेज व चित्रकला महाविद्यालय मधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व छात्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





















