1St Yr Opening Ceremony 2025-26.

Home 9 College Events Gallery 9 1St Yr Opening Ceremony 2025-26.

GALLERY

“शिक्षणाच्या वाटेवर पहिला दिवस उजाडतो,
गुरूजनांच्या सान्निध्यात नवा आत्मविश्वास फुलतो.
हसतमुख चेहऱ्यांनी भरलेलं आजचं सभागृह,
तुमच्या स्वागतासाठी सजलंय हे ज्ञानगृह!”

श्री.डी.डी.विसपुते डी.एड्.कॉलेज,नवीन पनवेल
        नवागत विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत सोहळा! 

     श्री. डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालय मध्ये 19/07/2025 रोजी डी.एड.प्रथम वर्ष  नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस भव्य स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करताना अध्यापक विद्यालयाच्या सर्व प्राध्यापक व वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आपुलकीचा हात पुढे केला.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि संस्थेचा परिचय देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
     कार्यक्रमाच्या सुरवातीस शब्दसुमनांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सन्मानीय धनराज जी विसपुते साहेब, सचिव सौ.संगीता विसपुते मॅडम ,कॉलेजच्या प्राचार्या सन्मानीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम व अध्यापकांच्या हस्ते
दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
    प्रथम, ‘वार्षिक अहवाल’ व्हिडिओ च्या माध्यमातून सादर करून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आपल्याला पण ,या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अँक्टिव्हिटी करण्याची संधी मिळणार आहे याची त्यांना प्रचिती करून देण्यात आली.
      अध्यापिका सौ. नीता निंबाळकर यांनी प्रास्ताविका च्या माध्यमातून संस्थेचा परिचय व माहिती देऊन कार्यक्रमाचे उद्दीष्ट  स्पष्ट केले .
   व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज विषयी कृतज्ञता व्यक्त करत स्वतःचे अनुभव कथन केले.  तसेच प्रथम वर्षातील काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कॉलेजमधील अध्यापकांनी नवीन विद्यार्थ्यां चे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
     कॉलेजच्या प्राचार्या सन्मानीय कुसुम मधाळे मॅडम यांनी ..
* प्रत्येकामध्ये एक गरुड दडलेला आहे .तुम्ही तो गरुड शोधा. तुम्हाला सुद्धा त्या गरुडासारखे उंच झेपावते येईल.
* योग्य वेळी ,योग्य विचार व निर्णय घेता आले पाहिजेत.
* Strength आणि विकनेस वेळीच ओळखता आले पाहिजेत.
 ही वेगवेगळी उदाहरणे  देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
   संस्थेचे चेअरमन व कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानीय धनराज जी विसपुते साहेब यांनी  
डी.एड.कोर्स किती महत्वाचा आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये डी.एड.intigrated होणार आहे .शिवाय जुन्या d.ed. झालेल्या विद्यार्थ्यांना bridge कोर्स देण्यात येणार आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये झालेला बदल तुमच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. हे ही सांगायला ते विसरले नाहीत.
      सूत्रसंचालन द्वितीय वर्षातील छत्राध्यापिका  मयुरी साळवे  हिने केले तर,आभार अध्यापिका सौ.निर्मला पाटील यांनी केले. शेवटी वंदे मातरम करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
    या कार्यक्रमासाठी , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व  विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

 उत्साह, उमेद आणि नवचैतन्याने भरलेला हा दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक संस्मरणीय क्षण ठरला.