Special Lecture – “Avoid Junk Food, Take Care of Health”

Home 9 College Events Gallery 9 Special Lecture – “Avoid Junk Food, Take Care of Health”

GALLERY

शनिवार दिनांक 02 ऑगस्ट 2025

श्री.डी.डी. विसपुते डी. एड. कॉलेज मध्ये

“जंक फूड टाळा,आरोग्य सांभाळा ” यावर

एक विशेष व्याख्यानाचे आयोजन….

शनिवार दिनांक 2ऑगस्ट 2025

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित

श्री.डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालय आणि आरोग्य समिती ( योगकेंद्र) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने जंक फुड किती घातक आहे. यावर जनजागृती करण्यासाठी एक विशेष व्याख्यान – “जंक फूड टाळा , आरोग्य सांभाळा ” प्राचार्या मा.श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.

कॉलेजच्या अध्यापिका मंदाकिनी बाविस्कर यांनी सूत्रसंचालन करताना प्रथम मान्यवरांचा परिचय करून शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविका मध्ये, माननीय सुरेश जाधव साहेब उपाध्यक्ष आरोग्य सेवा समिती ( योगकेंद्र) ,पनवेल यांनी ,स्वर्गीय पु. ल.भारध्वज यांच्या जन्म शताब्दी निमित्त योग आणि आरोग्य संबंधित वेगवेगळे

उपक्रमाचे आयोजन केले आहे.हे सांगून आजच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले.

तर, पी.पी.टी द्वारे मा.डॉ. प्राजक्ता बोबडे – मोरे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, “जंक फूडमध्ये पोषणमूल्य अत्यंत कमी असून, त्याचा दीर्घकालीन परिणाम हृदयविकार, लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांमध्ये होतो.” त्यांनी विद्यार्थ्यांना संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले.

अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांनी

मा.डॉ. प्राजक्ता बोबडे – मोरे व मा. सुरेश जाधव साहेब उपाध्यक्ष आरोग्य सेवा समिती ( योगकेंद्र) ,पनवेल यांचे अध्यापक विद्यालयाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

तसेच आजचा व्याख्यानाचा विषय हा

अतिशय उत्सुकतेचा , जवळचा आणि गांभीर्याचा विषय होता. जंकफूड, फास्टफूड यातील फरक आणि त्या पासून कसे परावृत्त करता येईल याचे अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन मा.डॉ. प्राजक्ता बोबडे – मोरे मॅडम यांनी केले.तसेच मा.सुरेश जाधव

सर नेहमीच योगासाठी प्रेरणा देत असतात हे ही सांगायला त्या विसरल्या नाहीत.

शेवटी, मा. श्री.सुरेश जाधव साहेब यानी विद्यार्थ्यांना “जंक फूड टाळा,आरोग्य सांभाळा ” याविषयी स्लोगन तयार करणे, तसेच सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केली आहे. विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा अशा सूचना देऊन, योगा विषयी माहिती व योग वर्ग कोठे कोठे चालतात याची संपूर्ण माहिती असलेले परिचय पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी डी.एड कॉलेजचे विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते