Organizing an educational trip

Home 9 College Events Gallery 9 Organizing an educational trip

GALLERY

शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025

शैक्षणिक सहलीचे आयोजन…

आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री धनराज जी विसपुते सर यांच्या प्रेरणेने व प्राचार्या मा.श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने श्री डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालयातील छात्राध्यापकांची शैक्षणिक सहल शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी छोटा काश्मीर व पॅगोडा येथे आयोजित करण्यात आली होती.

या क्षेत्रभेटीचा प्रमुख उद्देश प्रकृती संपर्क साधणे, पर्यावरण जागरूकता निर्माण करणे ,आणि जैव विविधतेचे प्रत्यक्ष अनुभव घेणे तसेच भारतीय संस्कृती, ध्यानधारणा आणि स्थापत्य कलेविषयी माहिती मिळवून देणे, शांत आणि निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवणे हा होता.

सर्वप्रथम छोट्या काश्मीर परिसरात विविध प्रकारची झाडे फुलझाडे उंच असे निवडुंग औषधी वनस्पती बघून एक वेगळाच अनुभव छात्राध्यापकांना आला.

तसेच गोराई जेटी मार्गे बोट ने पॅगोडाकडे प्रवास केला. बोटीतून समुद्रावरील प्रवास हा एक वेगळा च अनुभव छात्राध्यापकांना आला .

पॅगोडा परिसरात भव्य सुवर्णरंगी पॅगोडा आणि सभोतालचा निसर्ग डोळे दीपवणारा होता.

तेथे बौद्ध जीवनदर्शन सांगणाऱ्या शिल्पकला व चित्रांनी सजलेले दालन,वेगवेगळे शिल्प, चित्रे, गौतम बुद्धाच्या शिक्षणाची माहिती लिहिलेली शिल्प पहावयास मिळाली. धम्मचक्र, आकाश देवी देव, गोराई साधू यांच्या मूर्ती पहावयास मिळाल्या. मुख्य ध्यानगृहामध्ये ध्यानधारणेसाठी लोक बसले होते ,व संपूर्ण ठिकाणी एक अध्यात्मिक शांतता अनुभवता आली.

भिंतीवर बौद्ध जीवनदर्शन सांगणाऱ्या शिल्पकला व चित्रांनी सजलेले दालन आहेत, माहिती केंद्रात विपश्यना साधने विषयी सखोल माहिती मिळाली. ध्यानगृह हे जगातील सर्वात मोठ्या दगडी घुमटांपैकी एक आहे जे पिलर शिवाय उभारले गेले आहे याची माहिती छात्राध्यापकांना मिळाली.

पॅगोडा ही केवळ एक वास्तू नसून एक अध्यात्मिक प्रवास आहे. येथे भेट दिल्यामुळे मनःशांती एकाग्रता आणि सकारात्मकता यांचा अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांनी ध्यान आणि मानसिक स्वास्थ यांचे महत्त्व समजून घेतले. या शैक्षणिक सहलीमध्ये प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशा तऱ्हेने ही शैक्षणिक सहल नियोजनाप्रमाणे अतिशय व्यवस्थित व आनंददायी अशी झाली.