Multifunctional Office associate Course  

Home 9 College Events Gallery 9 Multifunctional Office associate Course  

GALLERY

शनिवार दिनांक 26 जुलै 2025
श्री.डी.डी. विसपुते डी एड कॉलेज मध्ये
MOA – Multifunctional Office associate Course  चे आयोजन…..

      शनिवार दिनांक 26 जुलै 2025
श्री.डी.डी. विसपुते डी. एड. कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसाठी , Pratham Skill Training Centre  यांच्यावतीने MOA – Multifunctional Office associate Course चे आयोजन कॉलेज च्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
      कार्यक्रमाच्या सुरुवातीस अध्यापिका सौ .नीता निंबाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय व स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
    या कोर्स ची माहिती देण्यासाठी मा. प्रविण बनसोडे ‘प्रथम स्किल ट्रेनिंग सेंटर ‘ चे kokan Cluster प्रमुख – यांनी ,शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना आणावयाचे असेल तर अशा प्रकारचे ट्रेनिंग  देण्याची गरज आहे. इंडस्ट्री मध्ये जावयाचे असेल तर आपण अशा प्रकारचे कोर्सेस करून तयार होऊन च जाणे फार महत्वाचे आहे.
     तर, मा.जगदीश भगत यांनी महिलांच्यावर तयार केलेले स्वरचित गाणे म्हणून आनंददायी वातावरण निर्मिती केली. तर, सेंटर  प्रमुख माननीय पुष्पा गायकवाड यांनी व्हिडिओ क्लिप दाखवून या कोर्स विषयी माहिती सांगितली.
   शेवटी ,प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना ,
या कोर्स चा उपयोग तुम्ही भविष्यात करू शकता , तुम्ही प्रथम असे कोर्स करण्यासाठी स्वतः ची रुची निर्माण करा.असे सांगितले.शेवटी आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
    या कार्यक्रमासाठी डी.एड कॉलेजचे विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.